नोकरदारांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी,विनोद तावडेंची घोषणा

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भात मुंबईच्या दादरमध्ये पार पडलेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात विनोद तावडे बोलत होते

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2018 07:26 PM IST

नोकरदारांप्रमाणे  विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी,विनोद तावडेंची घोषणा

04 एप्रिल : मित्र कॉलेजमध्ये गैरहजर असतानाही, त्याच्या नावाची हजेरी देऊन, म्हणजेच प्रॉक्सी लावणाऱ्यांना आता कायमचा चाप बसणार आहे.  कारण कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक अटेंडन्स अनिवार्य करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केलीय.

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भात मुंबईच्या दादरमध्ये पार पडलेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात विनोद तावडे बोलत होते. दरम्यान 1300 शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना विनोद तावडेंनी उत्तर दिलं. विनोद तावडेंचा रोख शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर होता.

ज्युनियर कॉलेजमध्ये बायोमेट्रीक अटेंडन्स कंपल्सरी करणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. सध्या जवळपास राज्यातील तीस लाख विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत.   काही वर्षांपूर्वी पटसंख्येची गणना झाली असताना  अनेक विद्यार्थी गैरहजर असल्याची बाब समोर आली होती. मुलांची जहेरी वाढवण्यासाठी तसंच बोगस कॉलेजेसला आणि विद्यार्थ्यांना चाप बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2018 06:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...