News18 Lokmat

हे दिग्गज नेते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 05:54 PM IST

हे दिग्गज नेते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई 24 मार्च : लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 11 एप्रिलला होणार आहे. या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार 25 मार्च हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे. यात भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.

नितीन गडकरी यांनी 25 तारखेला अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करत ते सोमवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. नाना पटोले हे भाजपमध्ये असतना गडकरींचे समर्थक समजले जात होते. गडकरींनीच त्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणलं होतं. आता आपल्या गुरू विरुद्ध त्यांना लढावं लागणार आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे यवमतमाळमधून निवडणूक लढविणार आहेत. तेही सोमवारीच अर्ज भरतील. सलग तीन वेळा निवडणूक येणाऱ्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे.

तर प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून निवडणूक लढविणार आहेत. तिथे 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. तेही सोमवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि  लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींना लढत द्यावी लागेल. महास्वामींना भाजपने तिकीट दिलंय.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

Loading...

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...