'बिग बाॅस' अडचणीत, ना हरकत परवाना रद्दची नोटीस

'बिग बाॅस' अडचणीत, ना हरकत परवाना रद्दची नोटीस

'बिग बॉस' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेनं दिलेला 'ना हरकत' परवाना रद्द करा, असा अहवाल नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागानं दिलाय.

  • Share this:

02 डिसेंबर : 'बिग बॉस' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेनं दिलेला 'ना हरकत' परवाना रद्द करा, असा अहवाल नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागानं दिलाय. यावरून नगरपरिषदेनं बिग बॉसच्या संचालक कंपनीला अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यामुळे ही मालिका अंतिम टप्प्यात आली असताना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक देविदास कडू यांनी 'बिग बॉस'ला देण्यात आलेला परवाना आणि बांधकाम याबाबत माहिती मागवली होती. या अर्जाच्या आधारे नगरपरिषदेच्या मिळकत आणि अतिक्रमण विभागाने या मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या लोणावळा बाजार भागातील एबीसी बेअरिंग कंपनीच्या आवारात जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी परवानगी नसतानादेखील १३ व्हीआयपी स्वच्छतागृहे बांधल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच 'ना हरकत' परवाना देताना ज्या अटी व शर्ती घालून देण्यात आल्या होत्या, त्यापैकी अट क्र. २ व ७चा भंग झाला असल्याचे समोर आले.

सेलिब्रेटी राहत असलेल्या  घरातून जाणारं सांडपाणीही नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी प्रदुषित होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. म्हणून लोणावळा नगरपालिकेने शूटिंग बंद करण्याची मागणी केली आहे.

तीन वर्षांनंतरही सांडपाणीच्या विल्हेवाट लावण्यासाठी कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नसून, घरातही कचऱ्याची विल्हेलाट करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 12:06 PM IST

ताज्या बातम्या