S M L

...आणि अस्वलानं रस्ता पार केला

पन्हाळगडावरुन वाघबीळला म्हणजेच कोल्हापूरकडे येणारा हा रस्ता आणि याच रस्त्यावर या अस्वलाचं दर्शन झालंय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 8, 2017 03:00 PM IST

...आणि अस्वलानं रस्ता पार केला

कोल्हापूर, 08 जुलै : जंगली प्राणी सध्या मानव वस्तीत येण्याच्या घटना अनेक वेळा घडतात.त्यामध्ये अनेक प्राण्यांचा समावेश असतो. पण भर रस्त्यावर एक काळकुट्ट मोठं अस्वल तुम्हाला दिसलं तर ? होय ही घटना घडलीय कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळगडाजवळची.

पूर्ण वाढ झालेलं एक मोठं अस्वल गर्द झाडीतून वाट काढत येतं काय आणि थेट मोठा रस्ता पार करतं काय. पन्हाळगडावरुन वाघबीळला म्हणजेच कोल्हापूरकडे येणारा हा रस्ता आणि याच रस्त्यावर या अस्वलाचं दर्शन झालंय. काही क्षणापूर्वी एक बाईकस्वार रस्त्यावरून पास झाला आणि लगेचच या अस्वलानेही रस्ता पार केलाय.

अस्वल दर्शनानं कोल्हापूर जिल्हा आजही वनसंपदेनं किती समृद्ध आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. पण पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close