भुदरगड प्रतिष्ठानची सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम

भुदरगड प्रतिष्ठानची सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम

शाळा दत्तक योजनेअंतर्गत प्रतिष्ठानच्यावतीने 700 विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं.

  • Share this:

कोल्हापूर, ता. 28 जुलै : भूदरगड प्रतिष्ठानने आपल्या सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवलीय. शाळा दत्तक योजनेअंतर्गत प्रतिष्ठानच्यावतीने 700 विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात आली.

आता आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलनं : मराठा संघटनांचा एल्गार

भूदरगड प्रतिष्ठानने 4 धनगरवाड्यातील शाळाही दत्तक घेतल्या आहेत. धनगरवाडा, सावतवाडी, बेडीव, मेघोली या वाड्यांवरील विद्यार्थ्यांचा सर्व खर्च प्रतिष्ठान उचलणार आहे. सातशे विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पाटी, जेवणाचा डब्बा, स्पोर्ट टी-शर्ट आदी साहित्य वाटप करण्यात आलं. तर दत्तक घेतलेल्या शाळांना 5 हजारांच्या पहिला हप्ता देण्यात आला. भविष्यात भुदरगड प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यात योग आणि क्रिया शिक्षक नेमण्याचा संकल्प आहे. या प्रसंगी तहसिलदार अमरसिंह वाकडे, संदेश भोईटे, सागर मिसाळ, कोजिमाशिचे अध्यक्ष एच आर पाटील, सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

हेही वाचा..

प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन

पिकनिकला गेलेल्या युवकाचा अतिउत्साह त्याच्याच जीवावर बेतला

VIDEO : पाटण्यात पावसाचा कहर, हॉस्पिटलमधल्या 'आयसीयु'त घुसलं पाणी, पाण्यात आले मासे!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 09:15 PM IST

ताज्या बातम्या