मध्य प्रदेशातही काँग्रेसला हादरा ज्योतिरादित्य शिंदे पराभवाच्या छायेत

शिंदे राजघराण्याचा सदस्याचा कधीच पराभव होऊ शकत नाही हा समज या निवडणूकीत पूसला जाऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 01:47 PM IST

मध्य प्रदेशातही काँग्रेसला हादरा ज्योतिरादित्य शिंदे पराभवाच्या छायेत

भोपाल 23 मे : देशभर काँग्रेसची पिछेहाट सुरू असताना अमेठी पाठोपाठ काँग्रेसला दुसरा मोठा धक्का मध्य प्रदेशात बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले ज्योतिरादित्य शिंदे तब्बल 53 हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. ज्योतिरादित्य यांनी गुणा-शिवपुरी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. शिंदे राजघराण्याच्या एखाद्या सदस्याला पराभव पाहावा लागत असेल तर ती मोठी घटना समजली जाते.

ज्योतिरादित्य शिंदे यांचे कधी काळी सचिव असलेले  के पी सिंह यादव यांना भाजपने तिकीट देऊन मैदानात उतरवलं होतं. त्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंना घाम फोडलाय. या मतदारसंघातून शिंदे घराण्याचा कुठलाही सदस्य काँग्रेस किंवा भाजपकडून निवडणूक लढवत असेल तर तो हमखास विजयीच होईल असं समजलं जात असे. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदे यांचा विजय झाला होता.

शिंदे यांच्यासोबतच ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंगही पिछाडीवर असून साध्वी प्रज्ञासिंग या आघाडीवर आहेत.

पश्चिम बंगालमध्येही भाजपची आगेकूच

देशात सर्वात जास्त हिंसाचार झालेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या अभेद्य गडाला भाजपने जोरदार खिंडार पाडलं आहे. 2014मध्ये फक्त 2 जागा असलेला भाजप तिथे 17 जागांवर आघाडीवर आहे. तर तृणमूल काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने प्रचंड जोर लावला होता. त्या संघर्षाचा फायदा भाजपला झाला आहे.

Loading...

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

बंगाली जनतेवर अनेक वर्षं राज्य करणारी डावी आघाडी उलथून टाकत ममता बॅनर्जींनी या राज्यावर चांगला जम बसवला असतानाच आता भाजपचा वारू हळूहळू बंगाल काबीज करू पाहत होता. भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष या निवडणुकीत आधी नव्हते एवढे आक्रमक झालेले दिसले. ममता विरुद्ध मोदी असा सामना पश्चिम बंगालमध्ये रंगला होता.

लोकसभेसाठी बंगाली जनतेने विक्रमी मतदान केलं आहे. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतरही हे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा जागा आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर येतो.

मा, माटी, मानुष असं सांगत डाव्यांना धूर चारणाऱ्या ममता बॅनर्जी जवळपास दशकभरापासून बंगालवर प्रभुत्व गाजवत आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक मोठा मैलाचा दगड ठरणारी असेल.

गेल्या निवडणुकीत 34 जागा

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण भाजपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती. मतांची टक्केवारी गृहित धरली तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. चार जागा मिळवूनसुद्धा काँग्रेस वोट शेअरमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची डावी आघाडी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवूनही 2 जागीच विजयी होऊ शकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 01:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...