बाहुबली स्टाईल उडी जीवावर बेतली,धबधब्यावरुन पडल्यानं तरुणाचा मृत्यू

बाहुबली सिनेमात अभिनेता प्रभासने जशी धबधब्यावरुन उडी मारली, तशीच उडी मारणं भिवंडी तालुक्यातल्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2017 11:15 PM IST

बाहुबली स्टाईल उडी जीवावर बेतली,धबधब्यावरुन पडल्यानं तरुणाचा मृत्यू

21 जुलै : बाहुबली सिनेमात अभिनेता प्रभासने जशी धबधब्यावरुन उडी मारली, तशीच उडी मारणं भिवंडी तालुक्यातल्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. कारण या उडीनं त्याचा जीव घेतलाय. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार मोबाईल कॅमे-यात कैद झालाय.

भिवंडी तालुक्यातल्या आमणे गावात राहणारा इंद्रपाल पाटील हा २७ वर्षांचा तरुण १४ जुलै रोजी शहापूरजवळच्या माहुली किल्ल्याच्या परिसरात मित्रांसोबत पिकनिकसाठी गेला होता. यावेळी त्याने धबधब्याच्या वर चढून खाली पडणाऱ्या पाण्यात उडी मारली, मात्र यात त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर धबधब्यासारख्या ठिकाणी किंवा कुठेही पिकनिकला गेल्यानंतर नको ते धाडस करणं टाळायला हवं, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 11:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...