भिवंडी लोकसभा निवडणूक : काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत

भिवंडी लोकसभा निवडणूक : काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत

भिवंडीमध्ये भाजपने विद्यमान खासदार कपिल पाटील यांनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश टावरे निवडणूक लढवत आहेत. या दोन उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

  • Share this:

भिवंडी, 15 मे : भिवंडीमध्ये भाजपने विद्यमान खासदार कपिल पाटील यांनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश टावरे निवडणूक लढवत आहेत. या दोन उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने डॉ . अरुण सावंत यांना उमेदवारी दिली तर बसपाने ऐनवेळी डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांची उमेदवारी घोषित केली.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

मागच्या निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांना 4 लाख 11 हजार 70 मतं मिळाली होती. काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3 लाख 1 हजार 620 मतं मिळाली. मनसेचे सुरेश म्हात्रे इथे तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना 93 हजार 647 मतं मिळाली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांची स्थिती पाहिली तर या सगळ्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा होता पण आता इथे भाजपचाही प्रभाव वाढतो आहे. मागच्या निवडणुकीत भाजपला इथे विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्व मध्ये सेनेला ताबा मिळाला. शहापूर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा आहे.

राहुल गांधींवर खटला

याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संघाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे इथली निवडणूक गाजली होती. महात्मा गांधींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. याप्रकरणी भिवंडीचे संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

या निवडणुकीत मात्र राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा भिवंडीत झाली नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्येच तुल्यबळ लढत पाहायला मिळाली.

=================================================================================

VIDEO : भाजपला उत्तर देत ममतादीदीही उतरल्या रस्त्यावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 08:06 PM IST

ताज्या बातम्या