प्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचं निधन

नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 08:27 PM IST

प्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचं निधन

12 मे : प्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचं निधन झालंय. ते 88 वर्षांचे होते. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं.

भीष्मराज बाम अनेक खेळाडूंचे मार्गदर्शक, सल्लागार होते. क्रीडा मानसशास्त्र या दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रात भीष्मराज बाम यांनी मोलाचं योगदान दिलंय. खेळाडूंच्या आयुष्यात येणाऱ्या बॅड पॅचमधून कसं बाहेर पडायचं, नव्या आव्हानांना कसं सामोरं जायचं यावर त्यांनी अनेक खेळाडूंना जिव्हाळ्यानं मार्गदर्शन केलं.

लिएंडर पेसपासून ते अंजली भागवतपर्यंत अनेक खेळाडूंचे ते मार्गदर्शक होते. त्यांना राज्य सरकारच्या जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

तसंच पोलीस दलातील नोकरी आणि मनोसोपचार तज्ज्ञ असलेल्या भीम्षराज बाम यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही कार्य केलंय. त्यांनी ‘मना सज्जना’ हे पुस्तकही लिहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...