S M L
Football World Cup 2018

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखेर मिलिंद एकबोटेंना अटक

. सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी एकबोटेंना राहत्या घरातून ताब्यात घेतलं.

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2018 12:24 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखेर मिलिंद एकबोटेंना अटक

14 मार्च : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखेर आरोपी मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आलीये. सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी एकबोटेंना राहत्या घरातून ताब्यात घेतलं.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं दोन गटात मोठा हिंसाचार उफाळला होता. या प्रकऱणी  समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटीसह एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, अटक टाळण्यासाठी  सेशन्स कोर्ट, हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टाने अर्ज फेटाळून लावल्यामुळे एकबोटेंना अटक होणार हे निश्चित होतं. पण त्यानंतर एकबोटेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने एकबोटेला तात्पुरता दिलासा दिला होता. त्यानंतर आज सुनावणीदरम्यान एकबोटेची चौकशी केल्यावर बनवलेला तपास अहवाल आज पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टात सादर केला. त्यानंतर कोर्टाने एकबोटेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. एकबोटेचा जामीन अर्ज फेटाळून लावणार अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणेच पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पोलिसांनी एकबोटेला राहत्या घरातून अटक केली.

कोण आहेत मिलिंद एकबोटे ?

मिलिंद एकबोटे हे पुण्यातील हिंदुत्ववाद्यांसाठी युवकांची आक्रमक संघटना चालवतात. समस्त हिंदू आघाडी असं त्यांच्या संघटनेचं नाव आहे. दादोजी कोंडदेव पुतळा हटवतानाही त्यांनी तीव्र विरोध केला होता. तसंच प्रतापगडावरील अफजल खानाची समाधी हटवण्यासाठीही त्याने आंदोलन केलं होतं. पुणे महापालिकेच्या राजकारणातही तो यापूर्वी सक्रिय होते. आता एकबोटेची वहिनी मनपाची निवडणूक लढवते. पुण्यात हिंदुत्ववादी विरूद्ध पुरोगामी असा वाद उभारल्यास मिलिंद एकबोटे हे नेहमीच हिंदुत्ववाद्यांच्या बाजुने मैदानात उतरताना दिसतात. डिसेंबरमध्ये शनिवार वाड्यावर डाव्या संघटनांनी भरवलेल्या एल्गार परिषदेला मिलिंद एकबोटेंनी कडाडून विरोध केला होता. याच वादातून वढू ब्रुद्रूकमध्ये गोविंद महार समाधीच्या पोस्टरचा वाद उकरून दंगल घडवली असा प्रकाश आंबेडकरांचा आरोप होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close