News18 Lokmat

भीमा कोरेगाव : लोकांवर ड्रोनची नजर, विजयस्तंभाचा ताबा राज्य सरकारकडे

कोरेगाव-भीमाच्या चारही बाजूंना 11 ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2018 06:18 PM IST

भीमा कोरेगाव : लोकांवर ड्रोनची नजर, विजयस्तंभाचा ताबा राज्य सरकारकडे

पुणे, 26 डिसेंबर : दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथं होणाऱ्या 'विजय दिना'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या हिंसाचाराचे राज्यभर पडसाद उमटले होते. त्यामुळं यावेळी कुठलीही कसर बाकी न ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापरही करण्यात येणार आहे.


कोरेगाव-भीमाच्या चारही बाजूंना 11 ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तसंच विजय स्तंभ असलेल्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत त्यामुळे आता 12 जानेवारीपर्यंत या परिसराचा ताबा राज्य सरकारकडे राहणार आहे. ऐतिहासिक विजय स्तंभाला 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत लाखो भीमसैनिक भेट देत असतात. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांची संख्या 15 पटीनं वाढवण्यात आली आहे.


सुरक्षा व्यवस्था, पार्किग व्यवस्था, विजयस्तंभ कडे येणारे आणि जाणारे मार्ग यांची खास व्यवस्था.

Loading...


या वर्षी विजयस्तंभ कार्यक्रमाचं नियोजन पुर्णपणे जिल्हा प्रशासन करणार आहे. प्रत्यके गोष्टीसाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे, सुरक्षा व्यवस्था, पार्किग व्यवस्था, विजयस्तंभ कडे येणाऱ्या आणि जाणारे मार्ग आखून दिले जाणार आहेत.


जातीय सलोखा राहण्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करावेत असं जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितल तर पोलीस अधिक्षक संदीप पाटिल म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागाची कामे सुरु करण्यात आलेली आहेत.


पोलीस विभागाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येईल. पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतेही फ्लेक्स लावता येणार नाही. सोशल मिडायावर विशेष लक्ष ठेवण्यात येइल असंही पाटील यांनी सांगितलं. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

Special Report : आंबेडकरांचा आघाडीला 'हात' की ओवेसींना साथ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...