'भीमा कोरेगावमध्ये सभेची परवानगी देणार नाही'

'सभेसाठी दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र जागा दिली जाईल मात्र भीमा कोरेगावमध्ये कुठल्याही परिस्थितीत परिवानगी दिली जाणार नाही'

News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2018 05:29 PM IST

'भीमा कोरेगावमध्ये सभेची  परवानगी देणार नाही'

अहमदनगर, 4 डिसेंबर : भीमा कोरेगावला यावर्षी कोणत्याही परिस्थितीत विजयस्तंभ परिसरात कोणी कितीही मोठा असला तरी सभा घेऊ दिली जाणार नाही, मागच्या वर्षी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करणार्‍यांवर कारवाई केली जाईल असा स्पष्ट निर्वाळा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी अहमदनगर येथे दिला.


माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा जबाब पोलिसांनी नोंदवल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर कांबळे बोलत होते. पी.बी.सावंत, प्रकाश आंबेडकर कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं सांगत यावर्षी भीमा कोरेगाव किंवा शनिवारवाड्यावर कोणी सभा घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ सरकारशी आहे, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.


एलगार परिषदेत प्रक्षोभक भाषणं झाली होती. काही लोकांना विजय स्तंभावर अघटित घडविण्यासाठी पाठविण्यात आलं होतं.  मात्र पोलीस प्रशासन आणि शासन जागरूक असल्याने हा डाव साध्य झाला नाही. त्यामुळे यंदा सरकार सर्व काळजी घेत असून 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला केवळ अभिवादन करण्यासाठी परवानगी असेल.

Loading...


सभेसाठी दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र जागा दिली जाईल अशी माहितीही कांबळे यांनी यावेळी दिली. प्रकाश आंबेडकर आणि नक्षली कनेक्शन याबाबत त्यांनी बोलताना त्यासंदर्भात चौकशीनंतर सर्व सत्य परिस्थिती समोर येईलच असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केलं.


दरम्यान, सरकार परवानगी दिली नाही तरी भीमा कोरेगावमध्ये सभा घेणारच असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिलाय. सरकार विजय दिवसाची योग्य तयारी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 

'कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात सभा घेणार'; उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...