पुणे विद्यापीठात बिर्याणी खाऊन 'भीम आर्मी'चा निषेध

पुणे विद्यापीठात बिर्याणी खाऊन 'भीम आर्मी'चा निषेध

भीम आर्मीनं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती बाहेर बिर्याणी खाऊन निषेध नोंदवला

  • Share this:

11 नोव्हेंबर : शाकाहारी असाल तर सुवर्ण पदक मिळेल असा फतवा काढणाऱ्या पुणे विद्यापीठात भीम आर्मीनं चक्क बिर्याणी खाऊन निषेध व्यक्त केलाय.

भीम आर्मीनं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती बाहेर बिर्याणी खाऊन निषेध नोंदवला. पुणे विद्यापीठानं  वादग्रस्त परिपत्र काढून शाकाहारी असाल तर सुवर्णपदक, असं म्हटलं होतं. त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय

दरम्यान, शाकाहारी असाल तर सुवर्ण पदक मिळेल या वादग्रस्त अटीमुळे खळबळ माजवलेलं पुणे विद्यापीठाचं परिपत्रक ताबडतोब काढून घेण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी घेतला.  तसंच विद्यापीठाच्या वेब साईटवरूनही ते पत्रक काढण्यात आलंय. कीर्तनकार शेलारमामा यांच्या तर्फे 2006 पासून पुणे विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांना हे पदक देण्यात येतंय. यातील शाकाहारी असणे, प्राणायम, ध्यान, योग करत असेल तर प्राधान्य दिलं जाईल या अटीवरून गदारोळ माजला होता. शेलारमामा हे हयात नसल्याने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ही अट रद्द करण्यास सांगितली जाईल आणि न ऐकल्यास पारितोषिकच रद्द केले जाईल अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 10:50 PM IST

ताज्या बातम्या