प्रज्ञासिंह यांना काळे फासण्याचा इशारा देणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखाला घेतले ताब्यात

देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा केली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 01:59 PM IST

प्रज्ञासिंह यांना काळे फासण्याचा इशारा देणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखाला घेतले ताब्यात

मुंबई, २६ एप्रिल- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना गावबंदी आणि त्यांचे तोंड काळे करण्याचा इशारा देणारे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशोक कांबळे यांना पोलिसांनी राहत्या घरातून शुक्रवारी सकाळी ९ वाजता ताब्यात घेतले. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने मध्य प्रदेशातील भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

'साध्वी प्रज्ञासिंह यांचे तोंड काळे करणाऱ्या गावाला ५ लाखाचे बक्षिस देणार'

देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा केली होती. प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

काय म्हणाली होती साध्वी प्रज्ञासिंह

आपण श्राप दिल्यामुळेच हेमंत करकरे यांची हत्या झाली, असे संतापजनक वक्तव्य प्रज्ञासिंग यांनी केले होते. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याची भलावण त्यांनी केली होती. शहीद हेमंत करकरे यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या शहीद वीर जवानांचाही अपमान करून प्रज्ञासिंह यांनी देशविरोधी मानसिकता स्पष्ट केली आहे. असे असताना देशप्रेमाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या भाजपने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा घाट घातला आहे. भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हे त्यांनी त्यांच्याच कृतीतून दाखवून दिलेले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीदांच्या नावाने देशभर मतांचा जोगवा मागत असतानाच त्यांचाच पक्ष शहीदांचा अवमान करणाऱ्या व एका आरोपीला लोकसभेचे तिकीट देऊन आपल्या देशभक्तीचे प्रमाण देत आहे. त्यांच्या या कृतीचा देशभरातून विरोध होत असला तरी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तिकीट भाजप कायम करीत असेल तर भोपाळमधील देशप्रेमी जनता प्रचारासाठी फिरणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तोडं काळे करावे. तसेच चप्पलाचा हार घालून गाढवावर फिरवणे अशा वेगळ्या प्रकारे सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असे कांबळे यांनी सांगितले.


VIDEO: अर्जदाखल करण्याआधी नरेंद्र मोदींनी घेतलं कालभैरवाचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close