सभा रद्द झाल्यानंतरही चंद्रशेखर आझाद पुण्याला जाणार, हॉटेलबाहेर मोठी गर्दी

सभा रद्द झाल्यानंतरही चंद्रशेखर आझाद पुण्याला जाणार, हॉटेलबाहेर मोठी गर्दी

आझाद यांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील मनाली हॉटेलच्या बाहेर कार्यकार्त्यांनी एकच गर्दी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद काही वेळातच पुण्याच्या दिशेने निघणार आहेत. आझाद यांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील  मनाली हॉटेलच्या बाहेर कार्यकार्त्यांनी एकच गर्दी केली आहे.

लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांनीही आझाद यांची  हॉटेल मनालीला इथं जाऊन भेट घेतली. मुंबई पोलीस वाशीपर्यंत आझाद यांच्या सोबत असतील.

पुण्यातील सभा रद्द

पुण्यातील भीम अर्मीची सभा रद्द करण्यात आली आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण संस्थेनं परवानगी नाकाराल्यामुळे अखेर आता सभा रद्द करण्यात आली आहे. सध्या sspms मैदानावर स्टेज गुंडाळण्याचं काम सुरू आहे.

चंद्रशेखर आझाद यांची पुण्यातील sspms मैदानावर सभा होणार होती. परंतु, जागा मालकाने परवानगी दिल्याचं पत्र आयोजकांनी दाखवावं, असं पुण्याचे पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी सांगितलं होतं. परंतु, sspms मैदानावर सभा घेण्याबाबत जागा मालकाने भीम आर्मीला परवानगी नाकारली होती.

सुरुवातीला या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सभेची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. जागा मालकाने परवानगी नाकारल्यामुळे आता सभा रद्द करण्यात आली.


VIDEO: 'याद रखो मोदीजी', पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर रावण आक्रमक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 01:02 PM IST

ताज्या बातम्या