डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण..भीम आर्मीने सरकारवर केले हे आरोप

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण..भीम आर्मीने सरकारवर केले हे आरोप

जातीवाचक हेटाळणी केल्याने तसेच रॅगिंगच्या छळाला कंटाळून जळगावच्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागले आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जून- जातीवाचक हेटाळणी केल्याने तसेच रॅगिंगच्या छळाला कंटाळून जळगावच्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागले आहे. भीम आर्मीने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार जाणीवपूर्वक डॉ. पायल तडवी मृत्यूची केस कमकुवत करु पाहात आहे. म्हणूनच सरकारने राजा ठाकरे सारखा उच्चवर्णिय वकील दिला आहे. राजा ठाकरे यांनी बाजू कमकुवत केली, त्यामुळे आरोपी आता मोकाट सुटतील, असे भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी म्हटले आहे. आम्हाला अॅट्रॉसिटीचा खटला लढण्याचा अनुभव असलेला वकील द्या, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. सरकारच्या या धोरणामुळे पायलचे पालकही नाराज आहेत.

चार डॉक्टरांवर कारवाई..

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. नायर वैद्यकीय महाविद्यालया रुग्णालयात रॅगिंगला कंटाळून पायलने आत्महत्या केली होती. याप्रकरणी चार डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.

नायर हॉस्पिलमधील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा जणांच्या समितीची नेमणूक करण्यात आली होती. समितीने चौकशी करून दिलेल्या अहवालानंतर चारही डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.

पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी करण्यात आलेली ही कारवाई मिळालेल्या अहवालाच्या आधारे करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येईल असं पालिकेचे आरोग्या विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील धामणे यांनी सांगितले.

डॉक्टरांवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल वेद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही माहीती दिली. तसेच डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांना भेटून याबाबत विचरण्यात येईल असंही महाजन म्हणाले. अॅन्टीरॅगिंग समितीने दिलेल्या अहवालावर गांभीर्याने विचार करणार असून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवरही कारवाई करण्याची मागणी त़डवी कुटुंबीयांकडून करण्यात आल्याचं पालिकेतील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तडवी यांच्या आत्महत्येची दखल महिला आयोगाने घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश राज्य महिला आयोगाने नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णलयाला दिले आहेत. तरुण डॉक्टरला रॅगिंगमुळे आत्महत्या करावी लागणं हे दुर्दैवी असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी सांगितलं आहे.

काय आहे हे प्रकरण?

मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या आदिवासी तरुणीने सीनिअर डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून काल, (ता.23) रात्री मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मयत डॉक्टर तरुणीच्या आईने 10 मे रोजी राज्याचे आरोग्यमंत्री, पोलीस निरीक्षक,आग्रीपाडा पोलीस स्टेशन, भायखळा नायर हॉस्पिटल मुंबईच्या एच.ओ.डी. यांच्याकडे तक्रार दिली होती. परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता कारवाई न झाल्याने नाहक या मुलीचा बळी गेल्याचं मृत विद्यार्थिनीची आई आबेदा तडवी यांनी म्हटले आहे.

अपमानास्पद वागणुकीमुळे डॉ.पायलने संपवली जीवनयात्रा

अपमानास्पद वागणुकीचा त्रास असहाय्य झाल्याने डॉ.पायलने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. डॉ.पायल तडवी यांचा विवाह दोन वर्षापूर्वीच रावेर (जि.जळगाव) येथील मूळ रहिवासी असलेले भूलरोगतज्ज्ञ सलमान तडवी यांच्याशी झाले होते. प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने पायलला आपले जीवन संपवावे लागले. त्यामुळे पायलचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते.


VIDEO: उकाड्यानं हैराण झालेल्या दिलासा, गडचिरोलीत वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या