S M L

#BharatBandh : भारत बंदचे महाराष्ट्रातही पडसाद, नागपूरमध्ये बस पेटवली

नागपूरमध्ये जरीपटका इंदोर रोडवर आंदोलनकर्त्यांनी स्टार बसच्या काचा फोडल्या. तसंच बसमध्ये चढून आगही लावली.सुदैवानं यात कोणतेही प्रवासी जखमी झाले नाहीत.

Sonali Deshpande | Updated On: Apr 2, 2018 06:17 PM IST

#BharatBandh : भारत बंदचे महाराष्ट्रातही पडसाद, नागपूरमध्ये बस पेटवली

02 एप्रिल : दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचे प्रतिसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळाले. नागपूरमध्ये जरीपटका इंदोर रोडवर आंदोलनकर्त्यांनी स्टार बसच्या काचा फोडल्या. तसंच बसमध्ये चढून आगही लावली.सुदैवानं यात कोणतेही प्रवासी जखमी झाले नाहीत.

नंदुरबारमध्ये देखील आंदोलनकर्त्यांनी बसची तोडफोड केलीय. शहादाहून पाडळदाकडे जाणाऱ्या बसवर आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली. खबरदारी म्हणून शहादा बसस्थानकाची सेवा खंडीत करण्यात आली होती. तोडफोडीच्या घटनेनंतर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलीय.

तर तिकडे पालघरमध्ये भारत बंदला प्रतिसाद देताना कडकडीत बंद पाळण्यात आलाय. वाडा येथील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2018 06:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close