Elec-widget

VIDEO : प्रियकराच्या घरी सापडली विवाहित प्रेयसी, गावकऱ्यांनी काढली धिंड

VIDEO : प्रियकराच्या घरी सापडली विवाहित प्रेयसी, गावकऱ्यांनी काढली धिंड

विवाहित असतांना देखील एकमेकांसोबत संबंध ठेवण्याच्या आळ ठेवत गावकऱ्यांनी गावभर धिंड काढली

  • Share this:


प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

भंडारा,03 डिसेंबर: विवाहीत असतांना एकमेकांसोबत अनैतिक संबंध असणाऱ्या एका प्रेमीयुगुलाची गावात धिंड काढल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी मधील कोंढा गावात घडली आहे. गावकऱ्यांनी कायदा हातात घेऊन हा सर्व प्रकार करून त्याचे आपल्या मोबाईलमध्ये रेकार्डिंग सुद्धा केलं.

या प्रेमीयुगुलांनी विवाहित असतांना देखील एकमेकांसोबत संबंध ठेवण्याच्या आळ ठेवत गावकऱ्यांनी सायकल रिक्षात बसवून गावभर धिंड काढली. यातील पीडित महिलेला दोन मुलं आहेत आणि विवाहित असलेल्या रामकृष्ण कुरंजेकर याच्यासोबत संबंध असल्याचा तिच्यावर आरोप होता. गेल्या महिनाभरापासून गावात या विषयावरून वाद सुरू होता.

आपल्या संबधांमुळे गावात वाद नको म्हणून रामकृष्णने गावाबाहेर लग्न करून या महिलेला बायकोप्रमाणे राहण्याचा निर्णय घेतला. त्यातच महिला रामकृष्णच्या घरी भेटायला आली. तेव्हा आधीच चिडलेल्या ग्रामस्थांनी रामकृष्ण आणि या महिलेला एका सायकल रिक्षात बसवून त्यांची धिंड काढली.

Loading...

याप्रकरणी रामकृष्ण यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मोबाईलवरील फुटेज वरून १० लोकांना अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

गावकऱ्यांनी या दोघांची धिंड काढून त्यांना गावभर फिरविलं आणि शेवटी पोलीस पाटलाच्या घरी नेलं. पोलीस पाटलांने या प्रकारात लक्ष देण्यास नकार दिल्यानं गावकरी कायदा हातात घेऊन धिंड काढली होती. हा प्रकार पाहण्यासाठी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरलं होतं. या प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

देशभरात लहान सहान गोष्टींवरून कायदा हातात घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानंही लोकांना कायदा हातात घेण्यावरुन वेळोवेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे कान टोचले आहेत. पण लोक कायदा हातात घेत असल्याच्या घटनांमुळे लोकांच्या मनातील कायद्याची भीती कमी झाली का असा प्रश्न विचारला जातोय.

===============================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...