भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन!

विनायक हा भय्यू महाराज यांचा अत्यंत विश्वासू सेवादार होता. भय्यूजी महाराज त्याला आपल्या घरातील सदस्यपेक्षा जास्त मानत होते

News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2019 10:14 PM IST

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन!


इंदूर, 18 जानेवारी : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी त्यांचाच विश्वासू सेवादार विनायक दुधाडे यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात भय्यूजींना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे.

विनायक हा भय्यू महाराज यांचा अत्यंत विश्वासू सेवादार होता. भय्यूजी महाराज त्याला आपल्या घरातील सदस्यपेक्षा जास्त मानत होते. त्यामुळेच भय्यूजींनी आपली संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता विनायककडे दिले होते. आत्महत्येच्या वेळी भय्यूजींनी अशी सुसाईट नोटच लिहून ठेवली होती.

विनायक दुधाडे हा मुळचा नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहे. लोणी-हवेली या गावातील विनायकचं कुटुंबीय रोजगाराच्या शोधात इंदूरला गेलं होतं. तिथे त्यांचा भय्यूजी महाराज यांच्याशी संपर्क झाला होता.

विनायकचे आजोबा भिकाजी गणपत दुधाडे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर इंदूर येथील मालवा मिलमध्ये काम करत होते. त्यांना काशीनाथ दुधाडे, गोरख दुधाडे आणि विष्णू दुधाडे ही तीन मुले आहेत. इंदूरमध्ये पारनेर, जामखेड तालुक्यातील अनेक लोक राहतात. इंदूरमधील राजकारणातही नगर जिल्ह्यातील मतदार निर्णायक भूमिका बजावतात. दुधाडे कुटुंबीय राहत असलेल्या नंदानगर भागात बहुसंख्य लोकवस्ती नगर जिल्ह्यातील आहे.

Loading...

भय्यूजी यांच्या आयुष्याशी संबंधित सगळ्या गोष्टी विनायकला माहित असायच्या. त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्याचा हस्तक्षेप असायचा. इतकंच काय तर भय्यूजींच्या पहिल्या पत्नीच्या निधनांतर त्यांच्या मुलीची जबाबदारीही त्याने उचलली होती.

ज्या वेळी भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळ्या घालून आत्महत्या केली, तेव्हीही विनायक घरीच होता.

=================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 10:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...