तुम्ही काही गोपीनाथ मुंडे नाहीत, नामदेव शास्त्रींकडून पंकजांच्या पत्राला केराची टोपली

पंकजा मुंडेंच्या पत्रावर आयबीएन लोकमतशी बोलताना महंत नामदेव शास्त्री यांनी आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2017 07:06 PM IST

तुम्ही काही गोपीनाथ मुंडे नाहीत, नामदेव शास्त्रींकडून पंकजांच्या पत्राला केराची टोपली

27 सप्टेंबर : भावनिक आवाहन हे घातक आहे. जर प्रत्येकानं 20 मिनिटं मागितली तर भगवानगडाच्या ट्रस्टची समस्या फार मोठी होईल असं म्हणत भगवानगडाचे महंत डाॅ. नामदेव शास्त्री यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्राला केराची टोपली दाखवलीये.

भगवानगडावर दसऱ्या मेळाव्याचा वाद आता आणखी पेटणार अशी चिन्ह आहे. गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांनी "मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा" कृपया त्या असंख्य लोकांकडे बघा! काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. मी कोणासमोर कधीही झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आणि विनंती करते तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या अशी भावनिक साद घातली होती.

पंकजा मुंडेंच्या पत्रावर आयबीएन लोकमतशी बोलताना महंत नामदेव शास्त्री यांनी आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं.

नामदेव शास्त्री म्हणतात, "पंकजा मुंडे यांचं पत्र मिळालं. आता त्याला परवानगी द्यायची की नाही हा ट्रस्टचा निर्णय असतो. मागच्या वेळी भगवानगडावर प्रचंड गोंधळ झाला होता. गडावर दगडफेक झाली होती, चप्पला मारल्या गेल्या होत्या. हे भावनिक आवाहन ऐकायला चांगलं वाटतं. पण प्रत्यक्ष कृतीत घातक आहे. भगवानगड हे देवस्थान आहे. गडावर सगळेच पक्ष जर 20-20 मिनिटं मागत असतील तर भगवानगडाच्या ट्रस्टची समस्या फार मोठी होईल. कारण की भगवानगडाचे सर्वच भक्त आहे. त्यामुळे ट्रस्ट कुणाकुणाचं ऐकणार आहे. म्हणून राजकारण नको किर्तनकाराशिवाय दुसऱ्या कुणाचाही आवाज गडावरून ऐकायला गेला नाही पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे असं नामदेव शास्त्रींनी स्पष्ट केलं.

तसंच गोपीनाथ मुंडे हे पक्ष नव्हते तर ते श्रेष्ठ व्यक्ती होते.  गोपीनाथ मुंडे जेव्हा गडावर यायचे तेव्हा पक्ष बाजूला सारून यायचे. त्यामुळे त्यांची तुलना समाजामध्ये वेगळी आहे. त्यामुळे ट्रस्टने भगवानगडावर कोणत्याही राजकीय पक्षाला येण्यास परवानगी नाकारली आहे. कुण्या एकट्या व्यक्तीने यात दुखी होऊ नये असा टोलाही नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...