'या' दोघांनी लावली कर्नाटकच्या निकालावार 51 हजाराची पैज

कर्नाटकमध्ये दोन्ही पक्षांनी आपल्याचा विजयाचा दावा केला आहे. पक्षीय पातळीवर काहीही असो, पण याचा दोन प्रमुख पक्षाच्या दोन कट्टर समर्थकांनी ही पैज लावली आहे. विशेष म्हणजे ही पैज लेखी स्वरूपात ७ साक्षीदारांसमोर लावण्यात आली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: May 13, 2018 09:53 AM IST

'या' दोघांनी लावली कर्नाटकच्या निकालावार  51 हजाराची पैज

कोल्हापूर13 मे :   संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी चुरशीने मतदान काल पार पडले. काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. निकाल १५ तारखेला जाहीर होणार आहे. पण या  निवडणुकीत कोण जिंकेल याबाबत काँग्रेसच्या एका आणि भाजपच्या एका समर्थकाने चक्क  51000ची पैज लावली.

कर्नाटकमध्ये  दोन्ही पक्षांनी आपल्याचा विजयाचा दावा केला आहे. पक्षीय पातळीवर काहीही असो, पण याचा दोन प्रमुख पक्षाच्या दोन कट्टर समर्थकांनी ही पैज लावली आहे. विशेष म्हणजे ही पैज लेखी स्वरूपात ७ साक्षीदारांसमोर लावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील राजू मगदूम हे काँग्रेसचे तर नेमिनाथ मगदूम हे भाजपचे कट्टर समर्थक. माणगाव येथील वैष्णवी देवी मंदिर येथे निकाल कोणाच्या बाजून लागेल याबद्दल दोघांनीही चक्क ५१ हजारांची पैज लावली आहे.

जर काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आले तर नेमिनाथ मगदूम यांनी राजू मगदूम यांना रोख ५१ हजार द्यायचे.  जर भाजपचे जास्त उमेदवार निवडून आले तर राजू मगदूम यांनी नेमिनाथ मगदूम यांना ५१ हजार रोख देणेचे ठरले आहेत. विशेष म्हणजे यातील जो कोणी ही पैज जिंकेल त्याने जिंकलेली रक्कम वैष्णवी देवी मंदिर नूतनीकरणासाठी खर्च करण्याचे ठरले आहे. ही सर्व पैज ७ जण साक्षीदार यांच्या उपस्थितीत एका वहीच्या कागदावर लेखी स्वरूपात लिहून घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2018 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...