S M L

ऐन न्यू इयरच्या तोंडावर राज्यात बीअर महागणार

उत्पादन शुल्क वाढल्यामुळे आता एमआरपी, अर्थात बीअरच्या किमतीतही वाढ करू द्या, अशी मागणी बीअर कंपन्यांनी केली होती. ती आता राज्य सरकारनं मान्य केली आहे. याबाबतची अधिसूचना २३ डिसेंबरपासून लागू झाली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 26, 2017 09:53 AM IST

ऐन न्यू इयरच्या तोंडावर राज्यात बीअर महागणार

26 डिसेंबर:  राज्यात लवकरच बीअर महागणार आहे. त्यामुळे न्यू ईयरला पार्टी करणाऱ्यांना प्रत्येक बाटलीमागे २० ते ३० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. उत्पादन शुल्क विभागानं शुल्कात वाढ केली  आहे.

उत्पादन शुल्क वाढल्यामुळे  आता एमआरपी, अर्थात बीअरच्या किमतीतही वाढ करू द्या, अशी मागणी बीअर कंपन्यांनी केली होती. ती आता राज्य सरकारनं मान्य केली आहे. याबाबतची अधिसूचना २३ डिसेंबरपासून लागू झाली आहे. त्यामुळे भविष्यातही देशातलं सर्वात महाग बीअर मिळणारं राज्य महाराष्ट्रच राहणार आहे.

ऐन ३१ डिसेंबरला बीअरचे भाव वाढणार आहे. त्यामुळे न्यू इयरची पार्टी आता  लोकांना महागात पडणार आहे असं दिसंतय.

सरकारने अजून तरी मद्य आणि मादक पदार्थांवर जीएसटी बसवलेला नाही.पण या दरवाढीमुळे न्यू इयर च्या प्लॅनवर पाणी फिरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Loading...
Loading...

स्ट्राँग बीअरची किंमत  

- निर्मिती मूल्याच्या 4.6 पटीनं एमआरपी ठेवण्याची परवानगी

- याआधीची एमआरपी निर्मिती मूल्याच्या 4.25 पट

- 145 रुपयांची बाटली 175 रुपयांना

माईल्ड बीअरसाठी 

- निर्मिती मूल्याच्या 3.75 पटीनं एमआरपी ठेवण्याची परवानगी

- याआधीची एमआरपी निर्मिती मूल्याच्या 3.5 पट

- 140 रुपयांची बाटली 165 रुपयांना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 09:41 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close