बुटचोरीच्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या तरुणीचा पुन्हा विवाह

बुटचोरीच्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या तरुणीचा पुन्हा विवाह

ऐन लग्नातच राडा झाल्यानं मुलीच्या वडिलांना काळजी होती की मुली बरोबर कोण लग्न करेल परंतु अंबाजोगाईमधील सायगावमध्ये राहणाऱ्या युवका पुढे आला.

  • Share this:

बीड, 08 मे : केज तालुक्यातील कुंभेफळ येथे बुटचोरीवरून झालेल्या भांडांवरून थेट लग्न मोडले गेले होते. त्यानंतर आता लग्न मोडलेल्या मुलीला नवा जोडीदार मिळाला आहे. अंबाजोगाईतील सायगाव येथील तरुणाशी वधूची सोयरीक जुळलीय. काल रात्री हा विवाह संपन्न झाला.

दोन दिवसांपूर्वीच लग्नात मुलीकडच्या मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे यावरून चांगलाच वाद झाला होता. इतकंच नाही तर चक्क मारहाण झाली होती, या सगळ्या प्रकारानंतर हे लग्नचं मोडलं होतं.

ऐन लग्नातच राडा झाल्यानं मुलीच्या वडिलांना काळजी होती की मुली बरोबर कोण लग्न करेल परंतु अंबाजोगाईमधील सायगावमध्ये राहणाऱ्या युवकाने पुढे येत या मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्धार केला आणि काल रात्री हा विवाह संपन्न झाला.

दरम्यान, नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी सुलतान युनूस शेखचा रविवारी निकाह झाला. या विवाह सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ तसंच आप्तस्वकीय हे सहभागी झाले होते.

First published: May 8, 2018, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading