बीडमध्ये पोलिसांकडून हप्तेखोरी, वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या दाव्याने खळबळ

सर्व अधिकाऱ्यांच्या संपतीची चौकशी केली जावी,' अशी मागणी सामान्य नागरीक आणि वाळू वाहतूक चालक मालक करत आहेत.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 03:32 PM IST

बीडमध्ये पोलिसांकडून हप्तेखोरी, वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या दाव्याने खळबळ

बीड, 22 जून : 'बीडमध्ये 5 लाख रुपये हप्ता घेऊन वाळूचा काळा कारभार चालतो. तलाठ्यांपासून जिल्हाअधिकाऱ्यांपर्यंत हप्ते खोरीचे धागे दौरे आहेत', असा गंभीर आरोप करत कायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या चालक-मालक आणि कामगारांनी बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला.

'प्रशासनाकडून होत असलेल्या हप्तेखोरीचा सामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. वाळूच्या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांनी कोट्यवधीची माया जमवली आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या संपतीची चौकशी केली जावी,' अशी मागणी सामान्य नागरीक आणि वाळू वाहतूक चालक मालक करत आहेत.

महसूल प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी वाळू पट्टयाचे कायदेशीर लिलाव केले जातात. ठेका घेणाऱ्या ठेकेदाराकडून शासनाचा महसूल भरून घेतला जातो. मात्र इथं कायदेशीरपेक्षा बेकायदेशीर वाळू उपशाला कार्यालयातील अधिकारी हेतूपुरस्कर परवानगी देतात. यातूनच हप्तेखोरीचा जन्म होत आहे. गेवराई, माजलगाव, गोदावरीनदीच्या वाळू पट्टयात वारंवार बदली करुन येणारे अधिकारी कोटय़वधीची माया जमवत आहेत. या पिळवणुकीविरोधात वाळू वाहतूक चालक-मालक संघटनेनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे.

वाळू वाहतूकदारांच्या या आरोपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. तसंच पोलीस प्रशासनानेही हात वर केले आहेत. बीडमधील या हप्तेखोरीबद्दल आत्ता महसूलमंत्री आणि जिल्हाप्रशासन काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: beed
First Published: Jun 22, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...