बीडमध्ये राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर; धनंजय मुंडे कसा काढणार मार्ग?

बीडमध्ये आता राष्ट्रवादीतील अंतर्गत दुफळी समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 04:22 PM IST

बीडमध्ये राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर; धनंजय मुंडे कसा काढणार मार्ग?

बीड, 16 मार्च : बीडमध्ये लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं बजरंग सोनवणे यांना दिल्याने अमरसिंह पंडित समर्थकांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी झालेल्या निवडी अगोदर माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी फायनल झाल्याची चर्चा होती. तसेच पक्ष श्रेष्ठींकडून कामाला लागा असे सांगण्यात आल्याचे पंडित समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. अमरसिंह पंडित यांचे लहान भाऊ विजयसिंह पंडित यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे बीडमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाबद्दल चर्चा सुरू आहे.


बीडमध्ये पंकजा मुंडेंना करावा लागणार दुहेरी 'सामना'


काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

Loading...

अमरसिंह पंडित यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या फेसबुक पोस्टने वातावरण अधिकच तापले आहे. 'आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.' अशी पोस्ट विजयसिंह पंडित यांनी काल फेसबुकवर लिहिली. ती पोस्ट बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. पोस्टमुळे पंडित आणि सोनवणे यांच्यामधील नाराजी समोर आली. त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची गेवराई येथे होणारी बैठक रद्द करण्याची वेळ आली. अशी चर्चा देखील बीडमध्ये सुरू आहे.


पवार कुटुंबात सारं काही आलबेल?; फेसबुकवर केला फोटो शेअर

बीडमध्ये पंडित समर्थकांमध्ये फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गेवराई येथे आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. तसेच पक्षाच्या बूथ प्रमुखांची बैठक देखील रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीचे चित्र समोर आले आहे. यामुळे येत्या निवडणुकीत धनंजय मुंडें समोर गटबाजीतून मार्ग काढण्याचं आवाहन आहे.


VIDEO: मुंबईतील पूल दुर्घटनेबाबत धक्कादायक खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...