News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझ्या नवऱ्याला मारलं, आता माझाही खून करा'
  • बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझ्या नवऱ्याला मारलं, आता माझाही खून करा'

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 12:09 PM IST | Updated On: Dec 20, 2018 12:18 PM IST

    बीड, 20 डिसेंबर : प्रेमविवाह केला म्हणून बहिणीच्या नवऱ्याला संपवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. यानंतर आता ज्या तरूणीच्या पतीला संपवण्यात आलं ती तरूणी जे बोललीय ते ऐकूण कोणाचंही काळीज पिळवटून जाईल. 'माझ्या नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आता मलाही मारा,' असं ही तरूणी म्हणाली आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी 'सैराट' सिनेमात ज्या प्रकारे आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आली होती अशीच घटना बीडमध्ये घडली आहे. बहिणीनं प्रेम विवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची भररस्त्यावर निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर हा गंभीर प्रकार घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी