News18 Lokmat

बीड हत्याकांड: भाग्यश्रीला दिलेले आश्वासन अर्धवटच, 6 दिवसानंतर फक्त एका आरोपीला अटक

खुनाचा कट रचणारा कृष्णा क्षिरसागर पोलिसाच्या जाळ्यात सापडला आहे तर बालाजी आणि संकेत अद्यापही फरार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 11:09 AM IST

बीड हत्याकांड: भाग्यश्रीला दिलेले आश्वासन अर्धवटच, 6 दिवसानंतर फक्त एका आरोपीला अटक

बीड, 24 डिसेंबर : बीडमधील ऑनर किलिंगच्या घटनेला 6 दिवस उलटल्यानंतर आज एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. खुनाचा कट रचणारा कृष्णा क्षिरसागर पोलिसाच्या जाळ्यात सापडला आहे तर बालाजी आणि संकेत अद्यापही फरार आहेत.

बहिणीशी प्रेम विवाह केल्यामुळे सुमित वाघमारे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सुमितची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांनी आरोपी मोकाट फिरत आहे त्याला अटक करा या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता.

वाघमारे कुटुंबाला कुठलंही संरक्षण देण्यात आलेलं नव्हतं. जर पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही तर मी अन्नत्याग करेन, असा इशारा भाग्यश्री वाघमारे यांनी दिला होता. 4 तासांत आरोपींना पकण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. पण घटनेला 6 दिवस झाल्यानंतर आज एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या आरोपींना अटक केल्याशिवाय भाग्यश्रीच्या टाहोंना न्याय मिळणार नाही.

काय आहे प्रकरण?

खोट्या प्रतिष्ठेसाठी 'सैराट' सिनेमात ज्या प्रकारे आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आली होती तशीच घटना बीडमध्ये घडली. बहिणीनं प्रेमविवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची भररस्त्यावर निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर हा गंभीर प्रकार घडला.

Loading...

इंजिनिअरिंगची परीक्षा देवून परतत असताना सुमित शिवाजी वाघमारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर मोटारसायकलवर आलेल्या बालाजी लांडगे आणि त्यांच्या मित्रानं धारधार शस्त्रानं हल्ला केला. यात सुमितचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री जखमी झाली.


बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझं लेकरू परत कोण आणून देणार', आईने फोडला हंबरडा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...