S M L

बीड हत्याकांड: भाग्यश्री वाघमारेंवर आंदोलन करण्याची वेळ, आरोपी मोकाटच

आज जर पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही तर मी अन्नत्याग करेन, असा इशारा भाग्यश्री वाघमारे यांनी दिला आहे.

Updated On: Dec 22, 2018 04:02 PM IST

बीड हत्याकांड: भाग्यश्री वाघमारेंवर आंदोलन करण्याची वेळ, आरोपी मोकाटच

बीड, 22 डिसेंबर : बीडमधील ऑनर किलिंगच्या घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे ज्या युवकाची हत्या करण्यात आली तिची पत्नी भाग्यक्षी वाघमारे यांनी अन्नदाग आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

वाघमारे कुटुंबाला कुठलंही संरक्षण देण्यात आलेलं नाही. आज जर पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही तर मी अन्नत्याग करेन, असा इशारा भाग्यश्री वाघमारे यांनी दिला आहे. 4 तासांत आरोपींना पकण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. पण घटनेला 3 दिवस झाल्यानंतर कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे प्रकरण?


खोट्या प्रतिष्ठेसाठी 'सैराट' सिनेमात ज्या प्रकारे आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आली होती तशीच घटना बीडमध्ये घडली. बहिणीनं प्रेमविवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची भररस्त्यावर निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर हा गंभीर प्रकार घडला.

इंजिनिअरिंगची परीक्षा देवून परतत असताना सुमित शिवाजी वाघमारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर मोटारसायकलवर आलेल्या बालाजी लांडगे आणि त्यांच्या मित्रानं धारधार शस्त्रानं हल्ला केला. यात सुमितचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री जखमी झाली.


Loading...

बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझ्या नवऱ्याला मारलं, आता माझाही खून करा'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2018 04:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close