चावलेल्या सापाला हातात पकडून 'तो' रुग्णालयात पोहोचला अन् जीव वाचवला!

एका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलायन असं चित्र पहायला मिळाले. त्या तरूणाच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा असा प्रश्न या वेळी रूग्णालयात उपस्थित झाला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2018 05:50 PM IST

चावलेल्या सापाला हातात पकडून 'तो' रुग्णालयात पोहोचला अन् जीव वाचवला!

शशी केवडकर, बीड,23 जून : साप पाहिल्यावर भल्याभल्यांची भंबेरी उडते पण बीडमध्ये एका तरुणाला साप चावला आणि त्याने न घाबरता त्या सापाला पकडलं आणि थेट रुग्णालय गाठलं..त्याच्या या धाडसामुळे त्याने स्वत:चा जीव वाचवलाच पण सापालाही जीवदान दिलं.

घडलेली हकीकत अशी की,  जिल्हा रूग्णालयात सकाळी ९:३० ची वेळ एक २७ वर्षाचा तरूण साप चावला म्हणून स्वत: चालत जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याच्या हातात पाच ते सहा फूट लांबीचा साप होता. हे चित्र पाहून सुरूवातील डॉक्टर तसंच नर्स घाबरल्या. मात्र त्या तरूणाला उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ त्या तरूणावर उपचार सुरू केले.

पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं

लखन गायकवाड असं साप चावलेल्या या धाडसी तरूणाचे नाव असून तो बीड येथील काळा हनुमान ठाणा येथील रहिवासी आहे. एका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलायन असं चित्र पहायला मिळाले. त्या तरूणाच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा असा प्रश्न या वेळी रूग्णालयात उपस्थित झाला.

तरुणांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या आलिशाला पश्चाताप, मागितली सगळ्यांची माफी

Loading...

त्याच वेळी सर्प मित्र आणि पोलीस असलेला त्याचा मित्र  अमित मगर यांना फोन करून बोलावून घेतलं. सर्प मित्र मगर हे रूग्णालयात आल्यानंतर त्या तरूणाच्या हातातून साप काढून घेण्यात आला.

रोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये !

अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लखनने हातात साप घेवून उपचार घेतले. एकीकडे सापाला जीवदान मिळालं.

लखन गायकवाड यांनी साप चावल्यानंतर त्याला पकडून जिल्हा रूग्णालयात आणले. सर्प मित्राच्या मदतीने त्या सापाला एका बंद भरणीत ठेवण्यात आले.

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणाऱ्या या पुणेरी पाट्या

लखन गायकवाड यांच्यावर आता उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठिक आहे. याशिवाय सापाला देखील सर्प मित्रामुळे जीवदान मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...