S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

एकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा

एक तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या महाविद्यालयात जाण्यासाठी बस थांब्यावर गाडीची वाट पाहत होती. यावेळी याच गावातील टवाळखोर ज्ञानेश्वर वीर या तरुणाने एकटक पाहू लागला आणि

Updated On: Nov 16, 2018 12:07 AM IST

एकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा

 


शशी केवडकर,प्रतिनिधी15 नोव्हेंबर : बीडमध्ये जिल्हा न्यायालयाने एक आगळा वेगळा आणि महिलांसाठी विशेष असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. एका रोडरोमिओ तरुणाने युवतीला डोळा मारल्याने त्या तरुणाला चक्क न्यायालयाने 3 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तरुणीच्या पालकांनी या सर्व प्रकारणाची त्वरीत दक्षता घेत त्या तरुणाविरोधात पोलिसाकडे तक्रार केली आणि संपुर्ण तपासानंतर त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.


अकरा महिन्यापूर्वी च्या या घटनेत पोलीस तपास आणि साक्षीदार यांनी दिलेल्या साक्षीमुळे शुल्लक वाटणारी ही घटना एक मिसाल बनली.


शिरूर तालुक्यातील भणकवाडी येथील एक तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या महाविद्यालयात जाण्यासाठी बस थांब्यावर गाडीची वाट पाहत होती. यावेळी याच गावातील टवाळखोर ज्ञानेश्वर वीर या तरुणाने एकटक पाहू लागला आणि असे करत असताना तिला डोळा मारला.


या सगळ्या प्रकाराने मुलगी घाबरून रडू लागली. नातेवाईकांनी तिला विचारले असता काहीशी लाजरीबुजरी होत तिने हा प्रकार सांगितला.


या संबधी मुलीच्या आईवडिलांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेळीच पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून चार महिन्यात दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.


दोन महिन्यापूर्वी हा खटला पटलावर आला यात सात साक्षीदारांच्या साक्षी झाल्या आणि जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी आरोपी ज्ञानेश्वर वीरला ३ वर्ष सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


(सांकेतिक छायाचित्र)


====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 08:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close