आधी गाव नंतर करिअर, गावाला मिळाली इंजिनिअर सरपंच !

आधी गाव नंतर करिअर, गावाला मिळाली इंजिनिअर सरपंच !

वयाच्या 26 व्या वर्षीच गावकऱ्यांनी ऋतुजा आनंदगावकरच्या गळ्यात सरपंचपदाची माळ घातलीय.

  • Share this:

शशी केवडकर,बीड

28 डिसेंबर : बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या त्या महत्त्वाकांक्षी तरूणीनं स्वप्नाला गवसणी घालताना, एरोनॉटिकल इंजिनीअरपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मनाजोगी नोकरी देखील मिळवली. मात्र जेव्हा सरपंचपदाची सूत्र सोपवण्यासाठी गावकऱ्यांनी हाक दिली, तेव्हा त्या तरूणीनं करिअरचा विचार करत बसण्यापेक्षा गावाच्या विकासाला प्राधान्य दिलं. राज्यभरातल्या तरूणींसाठी आदर्श ठरणाऱ्या तरूणीचा यशोगाथा सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात

बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या मंजरथ ग्रामस्थांची आशा, त्यांचा विश्वास आणि भविष्यही असं या तरूणीचं वर्णन केलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच वयाच्या 26 व्या वर्षीच गावकऱ्यांनी ऋतुजा आनंदगावकरच्या गळ्यात सरपंचपदाची माळ घातलीय.

माजलगावातल्या मंजरथसारख्या खेड्यात लहानाची मोठी झालेल्या ऋतुजाची स्वप्नं लहानपणापासूनच मोठी होती. आणि स्वप्नाला गवसणी घालताना ऋतुजा एरोनॉटिकल इंजिनिअर झाली. मात्र जेव्हा गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी साद घातली. तेव्हा क्षणाचाही विचार न करता ऋतुजानं मंजरथ गाठलं.

वडील राजेंद्र यांनी गावासाठी उपसलेल्या कष्टाचं फळ ऋतुजाला मिळालं आणि सरपंचपदाची निवडणूक तिनं सहज जिंकली.

गावाचा कायापालट करण्यासाठी ऋतुजाचा मास्टरप्लॅन आहे.

गावचं सरपंचपद आणि अहमदाबादमधली एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची नोकरी अशी दुहेरी कसरत ऋतुजाला करावी लागणार आहे.

ग्रामीण भागातली एक विद्यार्थिनी ते एरोनॉटिक इंजिनिअर आणि आता सरपंच...ऋतुजाचा हा प्रवास महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरूणीसाठी आदर्श ठरावा असाच आहे...पुढच्या वाटचालीसाठी ऋतुजाला न्यूज 18 लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा...!!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 11:32 PM IST

ताज्या बातम्या