बीड मतदारसंघाचा निकाल लागणार उशिरा, हे आहे कारण

बीड मतदारसंघाचा निकाल लागणार उशिरा, हे आहे कारण

बीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

  • Share this:

बीड, 20 मे : बीड लोकसभा निवडणुकीची मत मोजणीसाठी प्रशासनांकडून सर्व व्यवस्थाकरण्यात आली आहे. बीड लोकसभेचा निकाल महाराष्ट्रामध्ये सर्वात उशिरा लागणार असल्याचे संकेत आहेत. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे भवितव्य काय असणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. 2325 मतदान केंद्र असणाऱ्या बीड लोकसभेसाठी 169 मतमोजणी फेरीसंख्या असणार आहे. 37 उमेदवार असल्यामुळे तीन व्हीव्हीएम मशिन प्रत्येकवेळी तपासणी करावी लागणार असल्याने राज्यातील बीड जिल्ह्याचा निकाल सर्वात उशिरा लागणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल आणि एक पोस्टल मतासाठीचा टेबल असणार आहे. एकूण 84 टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमणूका पूर्ण झाल्या आहेत.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.  मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे 23 तारखेला बीडचा गड कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : EXIT POLL 2019 : 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर मुंबईतून दिल्लीत जाणार की नाही?

बीडमध्ये बजरंग सोनवणे जाएंट किलर ठरणार की मुंडे गड राखणार? EXIT POLL चा अंदाज समोर

बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना 9 लाख 22 हजार 416 मतं मिळाली. त्या 6 लाख 96 हजार 321 मताधिक्य मिळवून निवडून आल्या होत्या.

या निवडणुकीतही भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलं. वंचित बहुजन आघाडी आणि बसपानेही इथे उमेदवार उतरवले आहेत. या सगळ्या उमेदवारांना टक्कर देत प्रीतम मुंडे बीडमधून पुन्हा विजयी होणार का ? याची जोरदार चर्चा आहे.

मतदानानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलमधून देशभरातील मतदारसंघांबाबतचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. न्यूज18 च्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागेल. त्यामुळे प्रीतम मुंडे पुन्हा एकदा बाजी मारतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे तर बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. बीडमध्ये याही निवडणुकीत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या बहीणभावांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.


VIDEO : पार्थ पवार जिंकणार की हरणार? रोहित म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 09:03 PM IST

ताज्या बातम्या