S M L

बीडमध्ये 12 वर्षीय मुलाची आत्महत्या, ब्लू व्हेल गेमची शक्यता

सतत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडलीये.

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2017 11:19 PM IST

बीडमध्ये 12 वर्षीय मुलाची आत्महत्या, ब्लू व्हेल गेमची शक्यता

16 आॅगस्ट : सतत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडलीये. ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने जीवघेण्या ब्लू व्हेल गेमच्या लिंक हटवण्याचे गुगल, फेसबुक, याहु सारख्या वेबसाईटला आदेश दिले आहेत. पण तरीही गेममुळे आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. बीड जिल्ह्यात आष्टी शहरातील विनायकनगर येथे राहणारे जिल्हा परिषद शाळेतील अफजल शेख यांचा 12 वर्षीय मुलगा शेख दानीश अफजल याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

दानीश हा सारखा मोबाईलवर गेम खेळायचा. या तणावातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. मात्र, त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही. ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 11:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close