News18 Lokmat

...आणि नवरदेव पायी आले मंडपात !

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका नवरदेवला बसला आहे. त्याला चक्क पायी चालत मंडप गाठावा लागला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 13, 2018 03:35 PM IST

...आणि नवरदेव पायी आले मंडपात !

13 मे : शनिवार, रविवारच्या सलग सुट्ट्या आणि त्यात लग्नसराईचा मौसम आहे. त्यात उन्हाळी सुट्टी यामुळे पर्यटक फिरण्यास बाहेर पडले आहेत. परिणामी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका नवरदेवला बसला आहे. त्याला चक्क पायी चालत मंडप गाठावा लागला आहे.

पेणजवळच्या गावात विवाहासाठी निघालेला नवरदेवाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यातच लग्नाचा मुहूर्त जवळ येत असल्याने नवऱ्या मुलाची घालमेल होत होती. मग काय नवरदेव थेट पायी मंडपात जाण्यासाठी निघाले.

लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता पण रस्त्यावरच्या ट्रॅफिकमुळे नवरदेवाचं वऱ्हाड काही मंडपात पोहचलंच नाही. शेवटी वाहतूक पुढे सरकत नसल्याने नवऱ्याने आपल्या वाहनातून उतरून पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याची वाट न पाहता चालत निघालेला वर अखेर वेळेत आपल्या वधूला आणण्यासाठी मांडवात पोहोचला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2018 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...