News18 Lokmat

नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये संततधार पावसाने गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.शहरातील गटारांची काम व्यवस्थित न झाल्यानं गटाराचं पाणी गोदावरी नदीत येतंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 10:33 AM IST

नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

नाशिक, 14 जुलै : नाशिकमध्ये संततधार पावसाने गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.शहरातील गटारांची काम व्यवस्थित न झाल्यानं गटाराचं पाणी गोदावरी नदीत येतंय.

दुतोंडया मारुतीच्या कंबरेवर पाणी आलंय. गंगापूर धरण आतापर्यंत 45 टक्केचं भरलंय. गंगापूर धरणातून पाणी सोडलं नसतांनाही गटारीच्या पाण्यामुळे गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.

दशक्रिया विधिसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने परिसरातील धर्मशाळेतच सध्या धार्मिक विधि सुरू आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...