धक्कादायक: गरिबीला कंटाळून मुलींना विष पाजून आईची आत्महत्या

जुनमध्ये कुटुंबप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या कुटुंबाची परवड सुरू झाली होती

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 04:59 PM IST

धक्कादायक: गरिबीला कंटाळून मुलींना विष पाजून आईची आत्महत्या

विजय राऊत, जव्हार 8 जुलै : ठाणे जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. गरिबीला कंटाळून आईने आपल्या दोन मुलींना विष पाजले यात दोघींचा मृत्यू झालाय तर एक मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मुलींना विष पाजून आईने स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आलीय. रुक्षणा टोकरे या आपल्या चार मुलींसह इथे राहतात. जुनमध्ये त्यांच्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या कुटुंबाची परवड सुरू झाली त्याला कंटाळून रुक्षणा यांनी घरी असलेल्या दोन मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही आत्महत्या केली.

VIDEO : 'बारामतीत अजित पवारांचं काम जास्त, 2019 ला त्यांना हरवणं फक्त आशावाद'

पतीच्या निधनानंतर रुक्षणा यांचा आधारच गेला होता. पाचवीला असलेलं दारिद्रय, लहान मुली, कामचा अभाव यामुळे पैसेही नाहीत. त्यामुळे कुटुंबाचं पोट कसं भरायचं या विवंचनेत त्या त्रासून गेल्या होत्या. दररोजच्या जेवणाचीही भ्रांत असल्याने त्यांनी घरी असलेल्या दीपाली आणि वृषीली या मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केली. वृषीली ही फक्त 8 महिन्यांची आहे. तिने उलटी केल्याने तिचा जीव वाचला. तिच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नातवाला दूध मिळावं म्हणून 80 वर्षाच्या आजीनं विकली जमीन !

तर एक मुलगी शाळेत गेली असल्यानं तिचाही जीव वाचला. रुक्षणा यांच्या आईने पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केलीय.

Loading...

हा भाग आदिवासी बहुल असल्याने इथे सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येतात. रोजगात हमी, घरकुल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना सरकार आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजनांचा लाभ अजुनही सामान्यांपर्यंत पोहोचतच नाही हेच या घटनेतून दिसून आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. या अत्महत्येस जबाबदार सर्वच यंत्रणा प्रमुखावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...