जीव वाचवणाऱ्या टीमवरच अस्वल गेलं धावून!

रेस्क्यू टीम पोचली त्यांनी अस्वलाला बाहेरही काढलं पण अस्वल कदाचित घाबरलं असेल किंवा भूक-तहानेनं व्याकूळ झालं असेल ते या टीमच्याच मागे लागलं, त्यामुळे एकच पळापळ झाली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2018 02:23 PM IST

जीव वाचवणाऱ्या टीमवरच अस्वल गेलं धावून!

अमरावती, 07 मार्च : जीव वाचवणाऱ्या टीमवरच अस्वल धावून आलं. आणि लोकांना पळता भुई थोडी झाली. अस्वलाला विहिरीतून बाहेर काढल्यावर ते वाचवणाऱ्या लोकांच्या मागे लागलं.

घटना आहे अमरावतीच्या चिखलदरा भागातली. पिण्याच्या पाण्याच्या शोधात जंगलातून गावाकडे भरकटलेलं अस्वल जामली गावानजीकच्या एका कोरड्या विहिरीत पहाटे चार वाजता पडले. काही वेळाने शेतात जाण्यासाठी निघालेल्या आदिवासींना विहिरीतून ओरडण्याचा आवाज आला, त्यांनी वन विभागाला माहिती दिली, आणि रेस्क्यू टीम पोचली त्यांनी अस्वलाला बाहेरही काढलं पण अस्वल कदाचित घाबरलं असेल किंवा भूक-तहानेनं व्याकूळ झालं असेल ते  या टीमच्याच मागे लागलं, त्यामुळे एकच पळापळ झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2018 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...