S M L

पवारांनी शब्द पाळला, हवामान विभागाला पाठवली बारामतीची साखर !

आज पुण्याच्या वेधशाळेत तब्बल 300 किलो बारामतीची साखर पाठवण्यात आलीये

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2017 06:43 PM IST

पवारांनी शब्द पाळला, हवामान विभागाला पाठवली बारामतीची साखर !

23 आॅगस्ट : हवामान खात्याने आपला शब्द खरा ठरवत अचून अंदाज दिला. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपला शब्द पाळत खास बारामतीची साखर हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवली आहे.

बऱ्याच वेळा पावसाचा अंदाज चुकल्यामुळे हवामान खात्यावर टीका झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने पाठ फिरवली होती. मागील आठवड्यात हवामान खात्याने राज्यात पाऊस परतणार असं भाकीत वर्तवलं होतं.

राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलंय. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण हवामान खात्यातील काही तज्ज्ञ लोकांनी काल मला सांगितले की, राज्यात लवकरच चांगला पाऊस पडेल, त्यांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, त्यांचे म्हणणं खरं ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे.

आता शरद पवार यांनी आपला शब्द खरा ठरवत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना बारामतीची साखर पाठवली आहे. आज पुण्याच्या वेधशाळेत तब्बल 300 किलो बारामतीची साखर पाठवण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 06:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close