खळबळजनक! 13 वर्षीय विद्यार्थीनीवर अल्पवयीन मुलांकडून स्वच्छतागृहात बलात्कार

खळबळजनक! 13 वर्षीय विद्यार्थीनीवर अल्पवयीन मुलांकडून स्वच्छतागृहात बलात्कार

शाळेतीलच दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात शहर पोलिसांनी बलात्कार तसंच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

बारामती, 02 मे : बारामती शहरातील एका नामांकित  विद्यालयात 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतीलच स्वच्छतागृहात बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शाळेतीलच दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात शहर पोलिसांनी बलात्कार तसंच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शाळा परिसर त्याचबरोबर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तर पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.

घडलेल्या प्रकारासंबंधी पीडित मुलीने यासंबंधी फिर्याद दिली. पीडित मुलगी बारामतीतच राहते. शहरातील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात ती शिक्षण घेत आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत ही घटना 28 नोव्हेंबर 2018 रोजी घडली असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : आईसोबतच्या लैंगिक संबंधाने मुलाचा उद्रेक, डीएसपीला घातल्या गोळ्या

पीडितेची आरोपींशी तोंड ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. ती नववीत किंवा दहावीत शिकत असावीत, असा अंदाज फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. या दोघांपैकी उंचीने कमी असणाऱ्या मुलाने घटनेदिवशी शाळेच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या स्वच्छतागृहात तिच्यावर बलात्कार केला. तर दुसऱ्या उंचीने मोठ्या असलेल्या मुलाने त्याला यात मदत केली. अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपींना अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे याचा तपास करीत आहेत. तर या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनाची तसंच पीडितेच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

VIDEO : 'या' 6 वेळा काँग्रेसच्या काळात झाला सर्जिकल स्ट्राईक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rape case
First Published: May 2, 2019 10:55 PM IST

ताज्या बातम्या