सुप्रिया सुळे vs कांचन कुल, बारामतीत चुरशीच्या लढतीत फायदा कुणाला?

लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची माढामधून माघार, मावळमध्ये पार्थ पवारची उमेदवारी या दोन्ही कारणांमुळे बारामतीची लढतही नेहमीप्रमाणेच चांगलीच गाजली.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 12:55 PM IST

सुप्रिया सुळे vs कांचन कुल, बारामतीत चुरशीच्या लढतीत फायदा कुणाला?

बारामती, 10 मे : लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामती राखणार का ? त्यांचं मताधिक्य वाढणार की घटणार ? असे प्रश्न विचारले जात होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची माढामधून माघार, मावळमध्ये पार्थ पवारची उमेदवारी या दोन्ही कारणांमुळे बारामतीची लढतही नेहमीप्रमाणेच चांगलीच गाजली.

मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर कपबशीच्या चिन्हावर लढले तेव्हा सुप्रियाताईंना केवळ ६९ हजारांचं मताधिक्य होतं. यावेळी कांचन कुल कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने सुप्रियाताईंसमोर मोठं आव्हान होतं.

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, भोर, इंदापूर, दौंड, खडकवासला आणि पुरंदर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांमध्ये ही लढत अत्यंत चुरशीची बनली होती.

अजित पवारांनी दिलं आव्हान

बारामतीची निवडणूक भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळमध्ये जास्त ताकद लावली. त्यामुळे त्यांचं बारामतीकडे दुर्लक्ष होतंय का, असाही सवाल विचारला जात होता.

बारामती हा माझा मतदारसंघ आहे, तुम्ही इथे येताना विचार करा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत 24 गावांच्या पाण्याचा प्रश्न गाजला होता. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या गावांना हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं.

दिग्गज नेत्यांच्या सभा

कांचन कुल यांच्या प्रचारासाठी खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये सभा घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खडकवासल्यामध्ये सभा घेतली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीमध्ये भाड्याचं घर घेऊन दोन आठवडे मुक्काम ठोकला होता. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा प्रचार चांगलाच गाजला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close