बारामतीत मुलीवर धारदार शस्त्राने वार, गंभीर जखमी

बारामती शहरात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 01:03 PM IST

बारामतीत मुलीवर धारदार शस्त्राने वार, गंभीर जखमी

बारामती, 22 जून : बारामती शहरात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. खाटीक गल्ली परिसरात महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या जखमी झाली असून उपचारासाठी तिला पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बारामती शहरातील खाटीक गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला. त्यानंतर आरोपी अरबाज उर्फ अबू कुरेशी याने तांदळवाडी येथे राहत असलेल्या जबीन गुलाब कुरेशी या महिलेच्या घरात शिरून तिच्यावर सत्तुराने हल्ला केला.

आरोपीने या महिलेच्या मानेवर, तोंडावर आणि हातावर वार केले. यामध्ये ही महिला गंभीररित्या जखमी झाले असून या महिलेवर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आरोपी अरबाज उर्फ अबू कुरेशी याला अटक करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. शहरात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. या मुलीचा मंगळवारी उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. हल्ला करणारा आरोपी बालाजी उर्फ बाल्या अनिल माने हा अद्याप फरार आहे. वैष्णवी उर्फ चिमी अशोक जाधव असे मृत मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे वैष्णवी ही मटका किंग कृष्णा जाधव खून खटल्यातील आरोपी होती.

Loading...

पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...