मांढरदेवी प्रकरण : करणी काढण्यासाठी कुटुंब प्रमुखानेच पाजलं विष

मांढरदेवी प्रकरण : करणी काढण्यासाठी कुटुंब प्रमुखानेच पाजलं विष

"आपल्यावर करणी केली आहे ती काढण्या साठी विष्णुपंत चव्हाण याने एक प्रसाद दिला होता. देवदर्शना आधी हा प्रसाद पाण्यासोबत घेण्यास सांगितलं होतं."

  • Share this:

27 जुलै : मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना विषप्रयोग झाल्याचा प्रकार घडला. ही घातपात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख विष्णुपंत चव्हाण यांनीच हा प्रकार केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी विष्णुपंत चव्हाण ला ताब्यात घेण्यात आले आहे .

बारामती मधील चव्हाण कुटुंब देवदर्शनासाठी साताऱ्यातील मांढरदेवला आले होते. आपल्यावर करणी केली आहे ती काढण्या साठी विष्णुपंत चव्हाण याने एक प्रसाद दिला होता. देवदर्शना आधी हा प्रसाद पाण्यासोबत घेण्यास सांगितलं होतं. वडिलांनी सांगितल्या प्रमाणे विष्णुपंतच्या आई मुक्ताबाई पत्नी सविता,मुलगा स्वप्नील दोन मुली तृप्ती, प्रतीक्षा यांनी तो प्रसाद घेतला. यानंतर त्यांना उलत्याचा त्रास होऊ लागल्यानंतर ज्या गाडीतून ते गेले होते. त्या ड्रायव्हर ने त्यांना वाई येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत स्वप्नील चा मृत्यू झाला होता. आणि बाकीच्या चार जणांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना सातारा जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र घडलेला प्रकारानंतर रात्री उशिरा विष्णुपंत चव्हाण ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि पोलीस चौकशीत त्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 06:49 PM IST

ताज्या बातम्या