कर्जमाफीच्या मोठ्या घोळाचा खुलासा; बॅंकेत कर्जमाफीचा डेटा भरायला ठेवले विद्यार्थी!

कर्जमाफीच्या मोठ्या घोळाचा खुलासा; बॅंकेत कर्जमाफीचा डेटा भरायला ठेवले  विद्यार्थी!

यवतमाळमध्ये कर्जमाफीचा डेटा भरण्यासाठी अधिकाऱ्यांच्याऐवजी विद्यार्थी ठेवण्यात आले होते.यामुळेच फॉर्म भरताना अनेक चुका झाल्याचंही उघडकीस आलंय.

  • Share this:

17 डिसेंबर: कर्जमाफी करण्याचा दावा जरी सरकारने केला असला तरी त्यातले घोळ काही संपत नाही आहेत. अशाच एका घोळाची माहिती आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. यवतमाळमध्ये कर्जमाफीचा डेटा भरण्यासाठी अधिकाऱ्यांच्याऐवजी विद्यार्थी ठेवण्यात आले होते.यामुळेच फॉर्म भरताना अनेक चुका झाल्याचंही उघडकीस आलंय.

एक अर्ज भरण्यासाठी 5 ते 6 रुपये आणि काही ठिकाणी 10 रुपये घेतले गेल्याची माहितीही समोर आली आहे. त्यातून सरकारच्या या योजनेचा बोजवारा उडाला आहे.बँकांनी महाविद्यालयीन आणि संगणक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थयाना तसेच नुकत्याच पदवीधर झालेल्या तरुणांना शेतकऱ्यांचे अर्ज भरायला लावले, कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ 4 ते 5दिवस राहिलेले असताना हे काम दिले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कमी वेळेत अर्ज सादर करण्याच्या दाबावातून माहिती दिली गेली- अर्ज न करण्यापेक्षा दाखल करणे महत्वाचे मानून माहिती भरली गेली, त्यामुळे आधारपासून इतर माहितीच्या चुका कायम राहिल्या तसेच ठेवल्या गेल्या.

अनेक जिल्ह्यात असेच घडले आहे.

सरकारने 66 कॉलमचा ऑनलाईन अर्ज भरण्याची सक्ती केली होती, बराच काळ याकडे गांभीर्याने न पाहिलेल्या अनेक बँकांनी कालावधी कमी राहिलेला असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांकडे काम सोपवले.त्यामुळे सरकार या प्रकरणी कारवाई करत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 01:24 PM IST

ताज्या बातम्या