पुसदमध्ये बंजारा गौरव दिन साजरा

पुसदमध्ये बंजारा गौरव दिन साजरा

त्याच दिवसाचे औचित्य साधून वसंतराव नाईक यांची जन्मभूमी असलेल्या पुसद तालुक्यातल्या गहुली इथं बंजारा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला

  • Share this:

06  डिसेंबर:  यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये बंजारा गौरव दिन साजरा करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. म्हणून हा दिवस बंजारा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

त्याच दिवसाचे औचित्य साधून वसंतराव नाईक यांची जन्मभूमी असलेल्या पुसद तालुक्यातल्या गहुली इथ बंजारा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्री क्षेत्र पोहरादेवी येथून एक महारॅली काढण्यात आली होती.  ही रॅली वसंतराव नाईक यांच्या जन्मगावी गहुली इथ पोहोचली. तिथं नाईक यांच्या पुतळ्याला सर्व नेत्यांनी पुष्पहार अर्पण केला. हाच दिवस आता बंजारा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे.

वसंतराव नाईक यांनी तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळलं आणि त्यांच्याचं योगदानामुळं बंजारा समाजाला नवी दिशा मिळाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 11:03 AM IST

ताज्या बातम्या