सप्ताह समारोपामुळे बंद पुढे ढकलला ; हिंगोलीतील अनोखी घटना

सप्ताह समारोपामुळे बंद पुढे ढकलला ; हिंगोलीतील अनोखी घटना

मात्र हिंगोली इथं काल सप्ताह समारोप असल्याने आंबेडकरवादी संघटनांकडून आज बंदच आवाहन करण्यात आलं.

  • Share this:

04 जानेवारी: भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ काल महाराष्ट्र बंद होता. या बंदाचे सर्वत्र पडसाद उमटले. मात्र हिंगोली इथं काल सप्ताह समारोप असल्याने आंबेडकरवादी संघटनांकडून आज बंदच आवाहन करण्यात आलं.

काल हिंगोली शहरात रामायण सप्ताहाचा समारोप होता. बंदचा या सप्ताहासाठी आलेल्या भाविकांना त्रास झाला असता . शहरातील वातावरण बिघडलं असतं. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणुन आज बंदचा निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात जातीवाद फोफावत आहे. हिंगोलीत अनोखं सामाजिक एकतेचं उदाहरण दिसले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

त्यामुळे आता जातीवादाकडून जातीय सलोख्याकडे जाण्याची शिकवण आपण घेतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2018 09:20 PM IST

ताज्या बातम्या