पठ्ठ्याने आखाडा गाजवला, बाला रफिक शेख 'महाराष्ट्र केसरी'

News18 Lokmat | Updated On: Dec 23, 2018 10:22 PM IST

पठ्ठ्याने आखाडा गाजवला, बाला रफिक शेख 'महाराष्ट्र केसरी'

जालना, 23 डिसेंबर :  जालना इथं सुरू असलेली कुस्तिची दंगल लक्षवेधी ठरली. बुलडाण्याच्या बाला रफिक शेख याने पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव करत मानाचा महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला. अतिशय काट्याची लढत अभिजित आणि बालामध्ये झाली. पहिल्या काही फेऱ्यानंतर बाला वरचढ ठरला त्याने टाकलेले डाव अभिजितला उलटवता आहे नाही आणि बाला विजेता ठरला.


मंत्री अर्जुन खोतकर, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा देण्यात आली. मैदानावर जोरदार जल्लोष झाला. लोकांनी आणि समर्थकांनी बालाला डोक्यावर घेतलं आणि रोजदार घोषण दिल्या.


पुण्याच्या अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती . मागील वर्षी चॅम्पियन बनलेल्या अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं.  प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके आणि बुलढाणा इथल्या बालारफिक शेख यांच्यातला सामना जोरदार रंगला.

Loading...दरम्यान, महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच एकाच तालमीतल्या तीन पैलवानांनी माघार घेतली आहे. पंचांकडून अन्याय झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र केसरीचे दावेदार पोपट घोडके, हर्षल सदगिर, अतुल पाटील यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे. माती विभागात उपांत्य फेरीत जालन्याच्या विलास डोईफोडे विरुद्ध पोपट घोडकेची झुंज होती.


याच कुस्तीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अन्याय झाल्याचा आरोप करत पोपट घोडके तीन कुस्त्या जिंकूनही मैदानात हजर न झाल्यानं जालन्याच्या विलास डोईफोडेला विजयी घोषीत करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2018 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...