महाआघाडीला 'इंजिन' जोडण्यासाठी 'घड्याळ' उत्सुक; नांदगावकरांनी केलं 'हे' सूचक वक्तव्य

'राज्याच्या, देशाच्या हितासाठी जर सगळे एकत्र येत असतील आणि त्यासाठी चर्चा होत असेल तर हरकत नाही. असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 09:26 PM IST

महाआघाडीला 'इंजिन' जोडण्यासाठी 'घड्याळ' उत्सुक; नांदगावकरांनी केलं 'हे' सूचक वक्तव्य

मुंबई, 14 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधक एकत्र येताना दिसत आहेत. जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासंदर्भात देशातील प्रमुख नेत्यांची बुधवारी शरद पवारांच्या दिल्लीतील घरी मिटींग देखील झाली. त्याच धर्तीवर आता राज्यातील राजकारण देखील ढवळून निघत आहे. भाजपविरोधी महाआघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेण्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस देखील आग्रही असल्याचं दिसून आलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील दादर येथे भेट देखील झाली.

'आमची काहीच हरकत नाही'

महाआघाडीमध्ये सामील होण्याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 'राज्याच्या, देशाच्या हितासाठी जर सगळे एकत्र येत असतील आणि त्यासाठी चर्चा होत असेल तर हरकत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व विरोधकांना एकत्र येण्यासाठी यापूर्वी आवाहन केले होते. पण, त्यावेळी आम्हाला सोबत घ्या अस म्हटलं नव्हतं. अजित पवार आणि मिलिंद देवरा आम्हाला सोबत घेण्याच्या भावना बोलून दाखवतात याचा आम्हाला आनंद आहे. त्यासंदर्भात आमच्या पक्षात चर्चा सुरू आहे. दोन - तीन दिवसात निर्णय होईल'. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

करो या मरोची स्थिती?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या मनसेसाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. पक्षाची वाटचाल कायम राखण्यासाठी मनसेला या निवडणुकांमध्ये उमेदवार निवडून आणण्यावर भर द्यावा लागेल. परिणामी, महाआघाडीमध्ये सामील झाल्यास मनसेला त्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय, भाजपविरोधकांच्या ताकदीमध्ये देखील वाढ होऊ शकते. त्यामुळे 'करो या मरो'ची स्थिती असलेल्या मनसेला आगामी निवडणुका या महत्त्वाच्या आहेत.

Loading...

VIDEO : बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या जोडप्याचं जबरदस्ती लावलं लग्न


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 09:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...