S M L

नागपुरात अवैध धार्मिक स्थळं हटविण्यावरून बजरंग दल कार्यकर्ते आक्रमक!

शहरातील अवैध धार्मिक स्थळांवर कारवाईच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेती देवीदेवतांचे फोटो, मूर्ती काढून त्या बाहेर आणल्या निदर्शने केली.

Updated On: Sep 5, 2018 05:34 PM IST

नागपुरात अवैध धार्मिक स्थळं हटविण्यावरून बजरंग दल कार्यकर्ते आक्रमक!

नागपूर, 5 ऑगस्ट : महापालिकेच्या वतीने शहरातील अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयातील देवीदेवतांचे फोटो आणि मूर्ती काढून त्या बाहेर आणल्या आणि निदर्शने केली.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महानगर पालिकेतील महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि इतर सर्व समिती पदाधिकाऱ्यांच्या दालनांतील देवीदेवतांचे फोटो आणि मूर्ती काढल्या आणि त्या महापालिके बाहेर आणून आंदोलकांनी निदर्शने केली.

नागपूर शहरात रस्त्यांवर आणि सार्वजिनिक वापरासाठी राखीव असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या सर्व धर्माच्या जवळपास १५०० धार्मिक स्थळांवर महापालिकेच्यावतीने कारवाई सुरु आहे. आमची धार्मिक स्थळे सुरक्षित नाहीत, तर आमचे देवी-देवता या कार्यालयात कसे सुरक्षित राहु शकतात? असा प्रश्न उपस्थित करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. गणोशोत्सवादरम्यान महापालिका दरवर्षी कार्यालयाच्या परिसरात गणपती बसवते. शहरभरातील मंदिरे पाडली जात असताना, गणपती बसविण्याचा अधिकार मनपाला कुणी दिला? असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केलाय.

 VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 05:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close