06 एप्रिल : राज्यात बंदी घालण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीचा अखेर मार्ग मोकळा झाला आहेत.. विधानसभेत बैलगाडा शर्यत विधेयक मंजूर करण्यात आलंय. त्यानंतर प्रतीक्षा होती ती विधान परिषदेच्या निर्णयाची.. विधानपरिषदेनंही बैलगाडा शर्यत विधेयकाला मंजुरी दिलीये.
आज विधानसभेमध्ये बैलगाडी शर्यतीच्या मंजुरीबाबत विधेयक मांडण्यात आलं. बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी या मागणीने जोर धरला होता. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी मिळाल्यानंतर राज्यातल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीला बळ आलं होतं. या मागणीचा विचार करून सरकारने मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.
विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर बैलगाडा शर्यतीच्या मंजूरीचं विधेयक मांडण्यात आलं. त्याला आता मंजुरी देण्यात आलीये. दुपारी विधानसभेत या विधेयकाला हिरवा कंदील देण्यात आला होता. त्यानंतर विधानपरिषदेनंही बैलगाडा शर्यत विधेयकाला मंजुरी दिलीये त्यामुळे आता शर्यतीच्या पैठ्यावर पुन्हा सर्जा-राजा धावणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा