डीएसकेंना तात्पुरता दिलासा;मंगळवारी जामिनावर सुनावणी

रकारी वकिलांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्याने .तोवर पुण्यातील शिवाजी नगर कोर्टातील न्यायाधीश उत्पात यांनी डीएसके यांना 2 दिवस अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. अर्जावर मंगळवारी दुपारी 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2017 04:33 PM IST

डीएसकेंना तात्पुरता दिलासा;मंगळवारी जामिनावर सुनावणी

पुणे,04 नोव्हेंबर: उद्योजक डी एस  कुलकर्णी यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्याने .तोवर  पुण्यातील शिवाजी नगर कोर्टातील न्यायाधीश उत्पात यांनी डीएसके यांना 2 दिवस अटक न करण्याचे आदेश  दिले आहेत. अर्जावर मंगळवारी दुपारी 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

त्यापूर्वी डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी जानेवारी पासून आतापर्यंत ठेवीदारांचे 50।करोड रुपये परत दिले

मार्च 2018पर्यंत उर्वरित 209 करोड परत करू असं कोर्टात सांगितलं.आपण रोज पैसे परत करतोय असंही त्यांनी सांगितलं. देशाबाहेर पळून जाणार नाही त्याकरता पोलिसांकडे स्वतःहून पासपोर्ट जमा केला आहे .पण मी जेलमध्ये गेलो,बँक खाती गोठवली तर ठेवीदारांचे पैसे कोण देईल असा युक्तिवाद डीएसकेंच्या वकिलांनी केला  आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणुकदारांनी, पैसे मिळत नाहीत म्हणून वारंवार डीएसकेंविरूद्ध तक्रारी केल्या होत्या. केवळ आश्वासनंच मिळत असल्यानं अखेर सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर काल आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई सुरु केली. यावेळी डीएसके घरी तसंच ऑफिसात नव्हते. छाप्यांची बातमी पसरताच गुंतवणूकदारही जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर  हा जामिनासाठी अर्ज करण्यात आला.

आता या जामिनावर सुनावणी मंगळवारी होणार असल्याने डीएसकेंना जामीन मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2017 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...